Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मदिनात मशिदीबाहेर बॉम्बस्फोट

मदिनात मशिदीबाहेर बॉम्बस्फोट
मदिना- मुस्लीम धर्मियांचं पवित्र ठिकाण असलेल्या मदिना आणि कातिफमधील मशिदीजवळ 2 बॉम्बस्फोट झाले.  या स्फोटात 4 जणांचा मृत्यू झाला. ऐन इफ्तार पार्टीवेळी झालेल्या या स्फोटाने मदिनामध्ये एकच खळबळ उडाली.
 
याठिकाणी एक व्यक्ती संशयास्पद हालचाल करताना दिसला. त्यावेळी त्याला पकडण्याचा प्रयत्न झाला असता त्याने स्वतःला स्फोटाने उडवून दिलं. पहिला बॉम्बस्फोट कातिफमध्ये झाला. तर दुसरा स्फोट मदिनात झाला. एका आत्मघाती हल्लेखोराने मोहम्मद पैगंबरांच्या मशिदीजवळ स्वत:ला स्फोट करुन उडवलं.
 
पैगंबर यांच्या मशिदीजवळ पार्क करण्यात आलेल्या एका गाडीजवळ आत्मघाती हल्लेखोराने हा बॉम्बस्फोट घडवून आणला. हल्लेखोरानं हल्ला केलेला परिसर हा मुस्लिमबहुल भाग असून, याठिकाणी नमाज अदा करण्यासाठी अनेक लोकांनी गर्दी केली होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरू आहे. अद्याप या हल्ल्यांची कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारली नसल्याचे समजते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदींच्या मंत्रिमंडळात 19 नव्या चेहर्‍यांना संधी