Publish Date: Wed, 16 Jan 2008 (18:32 IST)
Updated Date: Wed, 16 Jan 2008 (17:42 IST)
जगातील सर्वात सुंदर स्त्री आणि जिच्या चेहर्यावरील स्मिताचे गूढ उकलण्याचा शतकानुशतके प्रयत्न केला, त्या मोनालिसाची खरी ओळख पटल्याचा दावा जर्मन संशोधकांनी केला आहे.
मोनालिसाचे चित्र सुमारे पाचशे वर्ष जूने असून तत्कालीन एका पुस्तकात एक महिला आणि तिच्या अस्फूट हास्याविषयी टीका केली आहे. ही महिला म्हणजेच मोनालीसा असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. पॅरिसच्या ल्रूव संग्रहालयात लावण्यात आलेला हा फोटो एक व्यापारी जियोकोंदो याच्या पत्नी लीज गेरार्दिनी हिचा आहे, असा दावा हेडलबर्ग विद्यापीठाचे प्रसिद्धी प्रमुख विये पोब्स्त यांनी केला आहे.