Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या ऑफिसात पोकेमॉन खेळायला फुल परमिशन

या ऑफिसात पोकेमॉन खेळायला फुल परमिशन
जगभरात पोकेमॉन फीव्हर चढला असल्याचा अनुभव येत असतानाच त्यावर उलटसुलट प्रतिक्रियाही येत आहेत. पोकेमॉन खेळण्यास अनेक ठिकाणी बंदी घातली जात आहे तर कांही ठिकाणी पोकेमॉन खेळण्याच्या नादात जीव गमावल्याच्या घटनाही घडत आहेत. पोकेमॉनमुळे अनेक अपघात घडल्याच्या बातम्याही नित्य येत आहेत. यातच अमेरिकेतील सोशलफ्लाय या ऑफिसच्या संस्थापक स्टेपनी कार्टिन यांनी मात्र त्यांच्या कर्मचार्‍यांना ऑफिसात बसूनही पोकमॉन गो खेळण्याची फुल परमिशन दिली आहे.

विशेष म्हणजे या कार्यालयात काम करणार्‍या सर्व मुलीच आहेत. या संदर्भात स्टेफनी सांगतात, मी ऑफिसात पोकेमॉन गो खेळण्याची परवानगी स्टाफला दिली आणि आमच्या कार्यालयाचे वातावरणच बदलले. माझ्या कामगार मुली यामुळे आनंदी राहताहेत व कामात अधिक लक्ष घालून ते चांगल्याप्रकारे पूर्ण करताहेत असा माझा अनुभव आहे. आणि त्या गेमच तर खेळतायत. पण त्यामुळे त्यांना आनंद मिळतो आहे व त्यांची मनस्थिती चांगली राहिल्याने कामही चांगले होते आहे.
 
तसे पाहिले तर काम करत असताना खेळ खेळायची कल्पना नवी नाही. इजिप्तमध्ये पिरॅमिडचे बांधकाम सुरू असताना तेथेही दोन गटात कोण अधिक काम करतो याची स्पर्धा व्हायची व जो विजयी होईल त्याला बीअर प्यायला मिळायची. कामाच्या ताणामुळे बोअर होत असेल तर खेळ त्या बोअरिंगमधून मुक्ती देतात व पुढचे काम अधिक जलद व चांगल्या रितीने होते असे संशोधकांचेही निरीक्षण आहे. त्यात पोकेमॉन अगदी आसपास, टेबलावर, बाजारात असा कुठेही सापडू शकतो त्यामुळे त्यात खेळणार्‍यांना अधिक रस निर्माण झाला आहे. शिवाय यात खेळणार्‍याला खूप फिरावे लागल्याने व्यायाम होतो तो वेगळाच.

2011 साली आलेल्या अँग्री बर्डनी असाच धुमाकूळ घातला होता. आकडेवारीनुसार तेव्हा हा खेळ खेळण्यात लोकांनी 11 अब्ज तास वाया घालविले होते. एवढय़ा वेळात पनामा कालवा बांधून झाला असता असेही सांगितले जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रतोद यांची वन टू वन चर्चा