Publish Date: Thu, 03 Jan 2008 (10:47 IST)
Updated Date: Thu, 03 Jan 2008 (10:45 IST)
शारीरिक दृष्ट्या अक्षम असलेल्या लहान मुलांसाठी अशी गाडी तयार करण्यात आली आहे की, जी त्यांना केवळ मनोरंजनाचे साधन उपलब्ध करून देईल व एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी घेऊन जाण्यास मदतही करेल.
डेलावेअर विद्यापीठातील शास्त्राज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारची गाडी तयार करण्यापाठीमागचा प्रमुख उद्देश म्हणजे कमी वयातील अक्षम मुलांचा योग्यप्रकारे विकास होण्यास मदत होईल.
संशोधकांनी या गाडीला बंपर कार आणि रोबोटसारखे रूप दिले असून तिला जॉयस्टिकच्या मदतीने सहा महिन्याचा मुलगादेखील चालवू शकतो.
विद्यापीठातील प्राध्यापक कोल गॅलोवे यांनी सांगितले की, एका सहा महिन्याच्या मुलीला जेव्हा या गाडीवर बसविले तेव्हा ती स्वत: हळूहळू हात मारत गाडी चालवणे शिकली. गाडीमध्ये लावलेल्या जॉयस्टिकवर हात पडल्यावर गाडी आपोआप चालू होते.
जॉयस्टिकचा अर्थ म्हणजे 'गो' आहे. ते सांगतात की, मुलांना या गाडीपासुन काहीही धोका नाही कारण रोबोट स्वत: या गाडीला नियंत्रित करतो.
(नईदुनिया)