Publish Date: Sun, 15 Jul 2007 (11:15 IST)
Updated Date: Sun, 15 Jul 2007 (11:14 IST)
आंतराष्ट्रीय दहशतवादी संगठना अल कायदाचा प्रमुख ओसाम बिन लादेनने नवीन चित्रफीती काढली आहे. यात त्याने मुसलमानांना शहादतचा रस्ता निवडण्याचे आवाहन केले आहे.
इस्लाम दहशतवाद्यांकडून चालवण्यात येणार्या संकेतस्थळावर ठेवण्यात येण्याआधीच हा टेप अमेरिकी वृत्त वाहिनी सीएनएनच्या हाती लागला होता. परंतु या वृत्तवाहीनीने सागितले की 40 मिनीटाच्या या टेपमध्ये प्रामाणिकता सिध्द होऊ शकत नाही त्यांनी याचा अरबी व इंग्रजीत अनुवाद केला आहे. या टेपचे छायाचित्रीकरण कधी व कोठे झाले या बद्दल वाहीनीच्या संकेतस्थळावर काहीच बोलले नाही.
सीएनएनने सांगितले की या टेपमध्ये पूर्वीचेच चित्रांकन आहे परंतु याला चार आठवड्यांपूर्वीच अंतिम रूप देण्यात आले आहे. या टेपमध्ये लादेन ज्या वातावरणात बोलता आहे ते 11 सप्टेंबर 2001 च्या अमेरिकी हल्लाच्या आधी काढलेल्या टेपशी मिळते आहे.
वाहिनीचे वरिष्ठ संपादक ओक्टाविया नस्र यांनी सांगितले की या टेपमध्ये लादेनने 50 सेकंद दाखवले आहे ज्यात तो आपल्या अनुयायांना संबोधित करताना दाखवले आहे. तो यात सैन्याच्या वेषात दाखवण्यात आला आहे.