Article International Marathi News %e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87 %e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be %e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%97 %e0%a4%aa%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a5%80 108033100033_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विमाने भारताला 'महाग' पडली

विमानं भारताला 'महाग' पडली
अमेरिकेकडून भारतीय हवा‌ई दल सुपर हर्क्युलस विमाने खरेदी करत आहे. या संबंधीच्या करारावरही दोन्ही देशांच्या अधिकार्‍यांनी स्वाक्षरी केली आहे. पण हाच सौदा भारताला अत्यंत महाग पडला असून, दामदुपटीने ही विमाने खरेदी केल्याचे आता उघड झाले आहे.

यावर्षी 31 जानेवारीला हा करार झाला होता. या करारानुसार भारतीय हवा‌ई दल अमेरिकेकडून सहा विमाने घेणार आहे. या विमानांपोटी सरकारला 96 कोटी चार लाख 9 हजार 112 डॉलर्स द्यावे लागणार आहेत.

कॅनडाला अमेरिकेच्या लाकहीड मार्टीन या विमान तयार करणार्‍या कंपनीने गेल्या वर्षी 17 विमाने केवळ 1 अब्ज 40 कोटी डॉलरला विकली
होती. भारताला केवळ सहा विमानांसाठी एवढी रक्कम चुकवावी लागणार आहे.

कॅनडाला हे एक विमान आठ कोटी डॉलरला मिळाले, भारताला हेच विमान 16 कोटी डॉलरला विकत घ्यावे लागत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi