Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिख व्यक्तीला जबर मारहाण

शिख व्यक्तीला जबर मारहाण
, शनिवार, 8 ऑक्टोबर 2016 (17:21 IST)
भारतीय वंशाच्या शीख व्यक्तीला अमेरिकीमध्ये  काही अज्ञातांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. तर या जबर मारहाणीत  मानसिंग खालसा जबत जखमी झाला आहे. मानसिंग हे  ते 41 वर्षांचे असून कॅलिफॉर्नियामध्ये आयटी तज्ज्ञ म्हणून काम करतात . या मारहाणीत मानसिंग  हात, डोळे, चेह-याला गंभीर दुखापत झाली आहे. मानसिंग जेव्हा  25 सप्टेंबर रोजी रात्री कामाहून घरी परतत असताना, 20 ते 30 वयोगटातील 5 ते 6 तरुणांच्या टोळक्याने त्यांच्या गाडीवर दारुची बाटली फेकली होती . यानंतर त्यांचा पाठलाग करत, त्यांच्यावर चाकूने वार केले, त्यांची पगडी पाडली, त्यांचे केस कापले, त्यांना शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली, असे खालसा यांनी सांगितले आहे. मानसिंग यांनी पोलिसात या विरोधात फिर्याद दिली आहे. अमेरिकेत नेहमीच मुस्लीम समजून शिख समाजाच्या व्यक्तीना मारहाण होत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आय एस आय प्रमुखाची हकालपट्टी सर्जिकल स्ट्राईकचा परिणाम