Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संयुक्त राष्ट्रसभा भारताचा पुन्हा पाकिस्तानवर वर तीन वार

संयुक्त राष्ट्रसभा भारताचा पुन्हा पाकिस्तानवर वर तीन वार
, शुक्रवार, 16 सप्टेंबर 2016 (15:47 IST)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश निती फार चांगल्या प्रकारे साभाळत आहे असे दिसत असून, संपूर्ण जगात भारताचा एक नवीन चेहरा त्यांनी नेला म्हणून चीन आणि पाकीस्थान अस्वस्थ आहे. मोदी यांच्या नितीने आपले भारतीय अधिकारी सुद्धा आता प्रभावीपणे देशाचे प्रश्न जागतिक स्थरावर मांडत आहे. त्याचीच प्रतीची आता सपूर्ण देशाला येत असून भरताने पुन्हा पाकिस्तानवर तीन प्रश्नाचे वार केले आहेत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंधित लोकांच्या यादीत तालिबानी नेत्याचा दहशतवादी म्हणून समावेश करण्यात न आल्याबद्दल भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. तर असे झाले नाही हे एक मोठे आश्चर्य आहे असे भारताने म्हटले आहे.
 
यासोबतच भारताने पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे हल्ला केला आहे, अफगाणिस्तानमध्ये हिंसाचाराचा कट रचणाऱ्या लोकांना त्यांच्याच शेजारी सुरक्षित स्थळ मिळू नये, असे भारताने स्पष्ट केले. सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानच्या संदर्भात सुरू असलेल्या एका चर्चेत बोलताना भारताचे स्थायी उपप्रतिनिधी तन्मय लाल भारताची प्रभावीपणे भूमिका मांडत होते, तालिबान जर आतंकवाद पसरवत आहे आणि त्यांच्या नेत्याला आतंकवादी संयुक्त राष्ट्र घोषित करत नाही हे योग्य नाही याचे उत्तर सयुक्त राष्ट्रसंघाने द्यावे अशी मागणी त्यांनी केली, तर दुसरीकडे आधीचा नेता मारला गेला तेव्हा तालिबानने मौलवी हैबतुल्ला अखुंदजादा याला आपला नवा नेता घोषित केले. परंतु अखुंदजादा याचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत कुठेही नाही, हे असे कसे असू शकते. संघटना आतंकवादी आणि नेता दहशतवादी नाही हे आचर्य आहे असा तिसरा प्रश्न लाल यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे भारताने आता पाक आणि चीन विरुद्ध चांगलीच मोहीम उगडली आहे. असे जगात चांगले आणि प्रभावी  चित्र निर्माण झाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जगातील सर्वात लहान बाळ जन्मले एमिलिया “छोटी योद्धा”