Publish Date: Fri, 14 Mar 2008 (10:37 IST)
Updated Date: Fri, 14 Mar 2008 (10:36 IST)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या प्रकरणानंतर आता न्यूयॉर्कचे गव्हर्नर इलियट स्पिटझर यांचे सेक्स स्कँडल प्रकरण सध्या चांगलेच गाजते आहे.
त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यावर लवकरच खटला दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.वेश्यावृतीला प्रोत्साहन देणे आणि बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेल्या रकमे विषयी त्यांच्यावर सरकार खटला दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
बुधवारी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अचानक स्पिटझर यांनी आपल्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला होता. फेडरल बँकेच्या निधीच्या चुकीचा उपयोग करणे आणि सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपींचा बचाव करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे.