हॅरी पॉटर स्टार डॅनियल रेडक्लीफ स्वतःला समलिंगी समजून घेण्यात धन्यता मानत असून ब्रिटनमधील 'कांटेक्ट म्यूजिक' या नियतकालिकानुसार 19 वर्ष वयाच्या या स्टारला लोक नेहमी समलिंगी समजत असल्याने ते त्याला ते आवडते. यामागे आपला चॉकलेटी चेहरा कारणीभूत असल्याचे डॅनियलचे म्हणणे आहे. ब्रिटनमध्ये अशा लोकांना 'कँप' असे संबोधले जाते.
डॅनियल आपण समलिंगी असल्याची बाब आपल्या मित्रांनाही ब्लागच्या माध्यमातून पसरविण्यास सांगत असतो. रेडक्लीफ म्हणाला, की ही बाब आश्चर्यचकीत करणारी आहे. माझे बालपण समलिंगी लोकांच्या संपर्कात गेल्याने कदाचित मी 'कँप' दिसत असेन मी जेव्हा लोकांना भेटतो ते मला नेहमीच समलिंगी समजतात. मला लोकांना मुर्ख बनविण्यात आनंद वाटतो.