Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘फ्लाईंग बॉम्ब’चं यशस्वी उड्डाण

‘फ्लाईंग बॉम्ब’चं यशस्वी उड्डाण
लंडन , शुक्रवार, 19 ऑगस्ट 2016 (16:51 IST)
जगातील सर्वात मोठं विमान ‘फ्लाईंग बॉम्ब’ने लंडनमध्ये उड्डाण केलं आहे. लंडनमधील कार्डिंग्टन एअरफील्डवरुन फ्लाइंग बॉम्बची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

ताशी 148 किमी वेगाने उडणारं एअरलँडर हे एक हेलिकॉप्टरच आहे. कारण याला उडण्यासाठी किंवा उतरण्यासाठी रनवेची गरज लागत नाही. या एअरक्राफ्टला पाण्यावरही उतरता येतं तसंच रिमोटनेही ते नियंत्रित करता येऊ शकतं.

ब्रिटनच्या हायब्रीड एअर व्हेईकल कंपनीने याचं डिझाईन बनवलं असून हे विमान ध्वनी आणि वायू प्रदूषण करत नसल्याचा दावाही केला आहे. हे एअरक्राफ्ट बनवण्यासाठी 10 वर्षांचा कालावधी लागला आहे. हेलिअम गॅसवर उडणाऱ्या या विमानाचा काही भाग विमानाचा, काही भाग जहाजाचा तर काही भाग हेलिकॉप्टरचा आहे. हे विमान तीन आठवड्यांपर्यंत आकाशात प्रवास करु शकतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात धरणांमधून पाण्याची गळती!