ऑनलाईन नोकरीचा इंटरव्यू देण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा जेणे करून आपल्याला काही त्रास होणार नाही आणि आपण सहज होऊन ऑनलाईन इंटरव्यू देऊ शकाल.
1 इंटरनेट व्यवस्थित असावे- सर्वप्रथम लक्षात ठेवा की इंटरनेट व्यवस्थित चालत आहे किंवा नाही. आपण ज्या लॅपटॉप किंवा मोबाईलने इंटरव्यू देत आहेत त्या सिस्टमवर नेट कनेक्ट आहे की नाही.नेटच्या स्पीडकडे लक्ष द्या. नेट व्यवस्थित नसेल तर आपण नोकरी गमावून बसू शकता.
2 व्हिडियो कॉलिंग योग्य असावे -कोणतेही ऑनलाईन इंटरव्यू देताना हे बघून घ्या की ज्या सिस्टम ने आपण इंटरव्यू देत आहात त्याची व्हिडियो कॉलिंग योग्य असावे . आवाजाकडे देखील लक्ष द्या, आवाज स्पष्ट असावा.
3 खोलीत प्रकाश योग्य असावा- आपण ज्या ठिकाणी बसून ऑनलाईन इंटरव्यू देत आहात त्या खोलीत प्रकाश योग्य असावा. खोलीत जास्त अंधार नसावा.
4 पोशाख योग्य असावा - बऱ्याच वेळा लोकांना असे वाटते की घरातूनच इंटरव्यू देत आहोत कोणते ही पोशाख घाला कोण बघणार आहे, परंतु असे नाही. आपल्या घातलेल्या व्यवस्थित पोषाखामुळे आपण ताजे तवाने होता आणि आत्मविश्वास देखील बनून राहतो. या शिवाय आपण ज्या ठिकाणी बसला आहात तिथे मागे काहीही नसावे. मागील जागा मोकळी असावी.