Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नोकरीसाठी जाताना....

नोकरीसाठी जाताना....

वेबदुनिया

, शुक्रवार, 9 डिसेंबर 2011 (15:24 IST)
ND
तुमचे व्यक्तिमत्व जितके विकसित तितका तुमचा आत्मविश्वास वाढत असतो. कोणतेही काम करताना तुमचे त्या कामातून झळकणारे व्यक्तीमत्वच तुमची खरी ओळख असते. त्यामुळे आजकाल व्यक्तिमत्व विकासासाठी स्पेशल कोर्सही लावले जातात. या माध्यमातून तुम्हाला एक नवीन दृष्टीकोन मिळत असतो.

तुम्ही जेव्हा तुमचे शिक्षण पुर्ण करून नोकरी शोधण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला याची जाणीव होते, की इतरांच्या मानाने तुम्ही केवळ तुमच्या नकारात्मक व्यक्तिमत्त्वामुळे मागे पडलात. मग दु:ख करण्‍यात तुम्ही तुमचे पुढचे आयुष्यही बरबाद करता. त्यापेक्षा नोकरीवर जाण्यापूर्वीच काही गोष्टींची माहिती तुम्हाला होणे गरजेचे आहे.

संपूर्ण माहिती घ्या:
ज्या कंपनीत तुम्ही नोकरीसाठी अर्ज केला असेल त्या कंपनीची माहिती आधी जमा करा. त्या कंपनीचा अभ्यास करा. त्या कंपनीचा इतिहास, तिची होणारी वाढ आणि हो नुकसानही कंपनीच्या वरिष्ठांना सांगाल म्हणजे तुम्ही कंपनीचा केलेला अभ्यास त्यांना जाणवेल. तुमच्या आवाजात कोणताही आक्रमकपणा जाणवू देऊ नका. वायफळ बडबड टाळा. एका वाक्यात मुळीच उत्तरे देऊ नका.

अधिकार्‍याने विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर प्रामाणिकपणे ते कबूल करा. उगाच खोटे उत्तर द्याल तर अडकाल.
कंपनीच्या कोणत्याही अधिकार्‍याला ओळखत असाल तरी त्याचे नाव सारखे सारखे इंटव्ह्यूमध्ये सांगू नका. अशाने अधिकार्‍यांचे तुमच्याबद्दलचे मत खराब होईल.
काही टेबल प्रोटोकॉल पाळा. तुमच्यासाठी चहा आणला असेल तरी तुम्ही अधिकार्‍यांनी तो चहा घेण्यापूर्वी पिण्याची घाई करु नका. कंपनीच्या आगामी दिशेविषयीच्या तुमच्या काही कल्पना असतील तर त्या अधिकार्‍यांना नुसत्या सांगूच नका तर त्यांना त्या पटवून देण्याचा प्रयत्न करा.

या बाबींकडे प्रकर्षाने लक्ष द्या:
1. तुमचे पाय सरळ ठेवा. तुम्ही पाय जर विळखा घातल्यासारखे ठेवले तर याचा अर्थ असा होतो, की तुम्ही नकारात्मक विचार करत आहात आणि तुम्हाला भीती वाटत आहे.

2. इंटरव्ह्यू घेणार्‍या अधिकार्‍याच्या डोळ्यात डोळे घालून बोला. तुम्ही जर असे केले तर तुमचा आ‍त्मविश्वास त्यातून दिसून येईल आणि समोरच्या व्यक्तीला तुम्ही सांगत असलेल्या गोष्टी खर्‍या आहेत हे पटेल.

3. तुमच्या खाद्यांना जरासेच पुढच्या बाजुने झुकवत समोरच्या वक्तीशी संवाद साधा. याचा अर्थ असा होतो की तुमचे मन साफ आहे. हो पण जास्त पुढे झुकु नका. त्याने तुम्ही समोरच्याची खुशमस्करी करत असल्याचे दिसून येते.

4. समोरची व्यक्ती किंवा अधिकारी तुम्हाला काही सुचना करत असतील तर त्यांचे वाक्य पुन्हा बोलू नका. तो त्यांचा अपमान समजला जातो. तुम्ही केवळ मानेने होकार देऊ शकता.

5 चेहर्‍यावर तेज दिसण्यासाठी त्या दिवशी मनात सकारात्मक विचार करा.

6 उनाडपणा करणे टाळा.

या काही महत्वाच्या टिप्स पाळाल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

ऐकलेले वाक्य स्वत: बोलण्याचा सराव-
सगळ्यात आधी संदर्भ दृश्यावरून बहुतेक गोष्टी कळून जातात. ऐकलेली लहान लहान वाक्ये आपण स्वत: तयार करून त्याची एक टिप्पणी तयार करून त्याचे पाठांतर करावे. टिप्पणीतील नावाच्या जागी आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे टाकून आपण स्वत: अधिक वाक्ये तयार करून ती लिहू, बोलू शकतो. इतर भाषांप्रमाणे इंग्रजी भाषा आधी बोलणे, त्यानंतर लिहिणे व मग वाचणे शिकले पाहिजे.

आपल्या मित्र मंडळीत किंवा आपल्या भाऊ बहिणींशी बोलताना आपण इंग्रजीत बोलण्याचा सराव केला पाहिजे. सुरूवातीला बोलताना चुका होतील. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे.

भाषेतील शब्दसंपत्ती वाढवा-
भाषा ही अक्षर, शब्द व वाक्यांनी बनली आहे. मात्र, अक्षरानी बनलेल्या शब्दाना व शब्दांपासून बनलेल्या वाक्यांच्या योग्य त्या समन्वयाने भाषा बनत असते. कुठल्याही शब्दाचे स्पेलिंग किंवा अर्थ पाठ करून घेणे पुरेसे नाही. तर त्याचा योग्य संदर्भासहीत वाक्यात उपयोगही करता आला पाहिजे. त्यामुळे इंग्रजी भाषेचा अभ्यास करण्यासाठी शब्दकोष जवळ असणे आवश्यक आहे.

काही शब्द चमत्कारीक असतात. त्यांचा अर्थ वाक्यानुरूप अथवा स्थळानुरूप बदलत असतो. त्यामुळे त्या शब्दाचे वाक्यात रूपांतर करणे आधी शिकले पाहिजे. शब्द भांडार वाढवल्याने भाषा शिकणे अधिक सोपे जाते.

व्याकरणाची मदत-
व्याकरण शिकल्यानंतरच भाषा शिकली जाते, असे नाही. लहानपणापासून बोलत असलेली मातृभाषा शिकताना कुठे आपण आधी व्याकरण शिकलो होतो. इंग्रजी भाषा परिपूर्ण शिकण्यासाठी व्याकरणाची मदत होत असते. इंग्रजी बोलताना आपण हळूहळू व्याकरणाचाही अभ्यास करता येऊ शकतो.

ऐकणे व बोलणे शिकल्यानंतर लिहिणे-वाचणे शिकावे-
भाषा ही मुख्यत: बोलण्यासाठी असते. परंतु, आपण ती ‍लिहिण्यासाठी व लिहिलेले वाचण्याची कला आत्मसात करून घेतली आहे. प्रत्येक भाषा बोलण्याचे एक विशिष्ट प्रकारचे तंत्र असते. त्याचप्रमाणे इंग्रजी शिकण्याचे तंत्र आहे. परंतु, इंग्रजी शिकत असताना मातृभाषाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.


Share this Story:

Follow Webdunia marathi