Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलाखतीला या चुका टाळा अन् नोकरी पक्कीच समजा!

मुलाखतीला या चुका टाळा अन् नोकरी पक्कीच समजा!
, मंगळवार, 29 मार्च 2016 (16:46 IST)
शिक्षण सुरु असताना आपल्याला चांगली नोकरी मिळावी अशी प्रत्येक तरुणाची अपेक्षा असते. पण जेव्हा तरुणाई नोकरीच्या शोधात असते त्यावेळेस काही गोष्टींकडे त्यांचे दुर्लक्ष होते आणि त्यामुळेच अपयश पदरी पडते. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोकरीच्या मुलाखती वेळेस संपूर्ण तयारी करणे गरजेचे आहे. 
 
पहिली गोष्ट लक्षात ठेवा : ज्या कंपनी किंवा सेक्टरमध्ये आपण कामासाठी जाणार आहोत त्याविषयी संपूर्ण माहिती नसणे त्यामुळे आपण ज्या ठिकाणी नोकरीसाठी जाणार आहात त्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. 
 
दुसरी गोष्ट लक्षात ठेवा : तुमची देहबोली फारच परिणामकारक असायला हवी. कारण की, तुम्ही काही बोला अथवा नका बोलू तुमची देहबोली बरंच काही सांगून जाते. मुलाखतीच्या रुममध्ये गेल्यावर तुमची पाठ सरळ, मान सरळ आत्मविश्वासाने ठासून भरलेल्या चेहर्‍यावर हलकसं हास्य गरजेचे आहे. जेव्हा तुम्हाला बसायला सांगितले जाईल त्यावेळेस खुर्चीच्या काठावर बसा. ज्यामुळे तुमची पाठ ताठ राहिल आणि थेट डोळे भिडवून तुम्ही समोरच्या व्यक्तीशी बोलू शकता. खुर्चीला रेलून बसू नका, कारण की, तुम्ही निवांत असल्याचे त्यातून दिसून येते. 
 
तिसरी गोष्ट लक्षात ठेवा : तुम्हाला जेव्हा एखादा प्रश्न विचारला जाईल त्यावेळी त्याचे उत्तर एकदम तांत्रिक देऊ नका. ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जाईल त्यावेळी थोडे प्रॅक्टिकल उत्तर द्या. तुमचे उत्तर हे खरे वाटायला हवे. 
 
चौथी गोष्ट लक्षात ठेवा : तुम्ही सध्याची नोकरी का सोडता आहात या प्रश्नावर मागील कांपनीबाबात कधीही वाईट मत मांडू नका. माझा बॉस चांगला नव्हता. पगार कमी आहे. अशी उत्तरे अजिबात देऊ नका. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुम्ही एक नवी सुरुवात करण्यासाठी आला आहात. कारण की, तुम्ही आज जिथे आहात ते तुमच्या जुन्या नोकरीमुळेत. मी माझ्या उज्जवल भविष्यासाठी या कंपनीसोबत करण्याचा विचार करती आहे. त्यामुळे मी करीत असलेली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशा आशयाचे उत्तर देणे गरजेचे आहे. 
 
पाचवी गोष्ट लक्षात ठेवा : बर्‍याचदा असे होते की तुम्हाला तुमच्या मनात असणारा प्रश्न विचारला जातो. अशावेळी त्या प्रश्नाचे लांबलचक उत्तर देऊ नका, जेवढ तुम्हाला माहिती आहे त्याविषयी थोडक्यात पण तितकच समर्पक उत्तर द्या. 
 
सहावी गोष्ट लक्षात ठेवा :  मुलाखती दरम्यान, अनेकांकडून शेवटची चूक होते. आपण मुलाखत घेणार्‍या व्यक्तीवर आपली छाप पाडण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. प्रत्येक गोष्टीत त्या व्यक्तीच्या होकाराला होकर देणे हे अगदीच योग्य नाही. काही जणांना ते आवडतं पण व्यावसायिकदृष्ट्‍या ही गोष्टी चुकीची आहे. ज्या व्यक्तीकडे वेगवेगळ्या कल्पना आहेत. असा व्यक्ती कायमच उजवा ठरतो. मुलाखत देताना नम्र राहा पण तुमचं मत ठामपणे मांडा.

Share this Story:

Follow Webdunia marathi