Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई-कोलकातामध्ये आज लढत

मुंबई-कोलकातामध्ये आज लढत
अबुधाबी , बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (15:30 IST)
तुल्यबळ संघ चेन्नई सुपर किंग्जशी आपली सलामीची लढत गमावलेल्या मुंबई इंडियन्सची आयपीएलमधील दुसरी लढत आज (बुधवारी) कोलकाता नाइट राडर्सशी होणार आहे.
 
येथील शेख जायेद स्टेडियममध्ये दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील केकेआरचा हा यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना असणार आहे. या सामन्यात मुंबई विजयी मार्गावर परतण्यासाठी प्रयत्न करेल तर केकेआर सलामीचा सामना जिंकून आपल्या विजयी अभियानाची सुरुवात करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. दोन्ही संघांमध्ये बिग हिटर्सचा भरणा आहे. रोहित शर्मा आणि शुभन गिल यांच्यातील फलंदाजीचे युध्द पाहण्यासारखे असेल. दोन्ही संघांमध्ये स्फोटक खेळाडूंची संख्या मोठी असल्याने ही लढत तुल्यबळ होईल अशी आशा आहे.
 
चेन्नईविरुध्द पहिल्या सामन्यात सलामीचा फलंदाज क्विंटन डी कॉकने संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र, सौरभ तिवारी वगळता मुंबईची मधली फळी चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी धावसंख्या उभारू शकली नाही. दिग्गज फाफ डू प्लेसिस आणि अंबाती रायडू या दोघांनी चेन्नईला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे मुंबईचे संघ व्यवस्थापन या सामन्यातील चुका सुधारण्याचा प्रयत्न करेल. मुंबईच्या गोलंदाजांनी जास्त धावा बहाल केल्या नसल्या तरी जसप्रित बुमराह एमकेव असा गोलंदाज ठरला, ज्याच्या गोलंदाजीवर चेन्नईचे फलंदाज तुटून पडले होते. जर मुंबईला पुनरागमन करायचे असेल तर बुमराहला चांगली कामगिरी करावी लागेल.
 
कोलकाताकडे पाहिले तर ज्यावेळी यूएईमध्ये आयपीएल झाली होती त्यावेळी कोलकाताने आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावे केले होते. त्यांनी पंजाबला अखेरच्या षटकात मात देत चषक उंचावला होता. यंदा कोलकाताने आपले अनुभवी खेळाडू ख्रिस लिन, रॉबीन उथप्पा, पीयूष चावला यांना संघातून सोडून दिले आहे आणि पॅट कमिन्स, इयॉन मॉर्गन, टॉम बँटन यांना आपल्या संघात दाखल केले आहे. केकेआरच्या फलंदाजी आक्रमणात नीतीश राणा आणि शुभन गीलसारख्या प्रतिभावंत खेळाडूंचा समावेश आहे. आपली फलंदाजी मजबूत करण्यासाठी फ्रेंचाइजीने टॉम बँटनला संघात सामील केले आहे. बँटन काय कमाल करू शकतो हे त्याने बिग बॅश लीगमध्ये सिध्द केले आहे. दुसरीकडे आंद्रे रसेलला पाहता केकेआरची मधली फळी धोकादायक वाटते. इंग्लंडच्या मॉर्गनमुळे हा संघआणखीन मजबूत झाला आहे. सुनील नरीन, टॉम बँटन किंवा गिल डावाची सुरूवात करू शकतात. हे तिघेही संघाला वेगवान सुरुवात करून देणत समर्थ आहेत. मागील हंगामात दिसून आले की, केकेआरचे यश बर्यासच अंशी फिरकीपटूंवर अवलंबून होते आणि संघाच्या फिरकी आक्रमणात नरीन, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती यांचा समावेश आहे. वरूणने आतार्पंत आयपीएलचा एकही सामना खेळलेला नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष - देवेंद्र फडणवीस