Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IPL Auction 2022: पंजाब किंग्जने 11.50 कोटींना लियाम लिव्हिंगस्टोन विकत घेतले

IPL Auction 2022: पंजाब किंग्जने 11.50 कोटींना लियाम लिव्हिंगस्टोन विकत घेतले
, रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (12:58 IST)
फोटो साभार -ट्विटर 
आयपीएल 2022 चा मेगा लिलाव बेंगळुरूमध्ये सुरू आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनला पंजाब किंग्जने 11.50 कोटींमध्ये खरेदी केले.

मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा फिरकी अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनसाठी जबरदस्त दंगल पाहायला मिळाली. एक कोटी मूळ किंमत असलेल्या या स्फोटक फलंदाजासाठी कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चुरशीची स्पर्धा होती. 
 
अखेरीस पंजाब किंग्जने या झंझावाती फलंदाजाला 11.50 कोटींना विकत घेतले. लियाम लिव्हिंगस्टोन यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. लिव्हिंगस्टोनपूर्वी, बेन स्टोक्स हा आयपीएलमध्ये विकला जाणारा सर्वात महागडा इंग्लिश खेळाडू आहे. 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वैद्यकीय शिक्षण दोन भाषांमध्ये घेण्याचा विचार , स्थानिक भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल