Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

KKR vs DC : पृथ्वी शॉने 27 चेंडूत अर्धशतक लावले

KKR vs DC : पृथ्वी शॉने 27 चेंडूत अर्धशतक लावले
, रविवार, 10 एप्रिल 2022 (16:26 IST)
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) संघ आज आमनेसामने आहेत. हा सामना रंजक असणार आहे कारण श्रेयस गेल्या हंगामात दिल्ली संघाकडून खेळत असे आणि त्याच्या नेतृत्वाखाली डीसी संघाला दोनदा प्लेऑफमध्ये नेले.आज त्याच संघाविरुद्ध श्रेयस मैदानात उतरला आहे. 
 
आयपीएलमध्ये रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. या हांगामात सुरुवातीच्या षटकांमध्ये कोलकात्याला विकेट्स मिळवून देणारा उमेश यादव या दोन खेळाडूंसमोर संघर्ष करताना दिसत आहे. शॉने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून उमेशचे स्वागत केले.
 
डावाच्या तिसऱ्या षटकात, उमेशने पृथ्वी शॉला बाद करण्यासाठी बाउन्सरचा वापर केला आणि लागोपाठच्या चेंडूंवर बाउन्सर मारला. यादरम्यान एक चेंडू पृथ्वी शॉच्या हेल्मेटला लागला. त्यामुळे सामनाही काही काळ थांबला. तिसर्‍या षटकाच्या चौथ्या चेंडूवर उमेशनेही बाउन्सर टाकला, पण शॉने कसा तरी चेंडू बॅटला लावला आणि चौकार मारण्यात यश मिळविले. पाचवा चेंडू शॉच्या हेल्मेटला लागल्याने तो सीमारेषेच्या पलीकडे गेला. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शॉने हवेत शॉट खेळत उमेशला जाणीवपूर्वक चोख प्रत्युत्तर दिले. त्याने मिडविकेट क्षेत्ररक्षकावर चौकार मारला.

मागील सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पृथ्वी शॉने शानदार 61 धावा केल्या होत्या. या हंगामात  पृथ्वी शॉने 4 सामन्यात 140 हून अधिक धावा केल्या आहेत. 
 
KKR vs DC दोन्ही संघ खालीलप्रमाणे आहेत
कोलकात्याच्या संघात सॅम बिलिंग्ज, आंद्रे रसेल, सुनील नरेन आणि पॅट कमिन्स हे चार परदेशी खेळाडू आहेत . तर दिल्लीचा संघ तीन परदेशी खेळाडूंसह मैदानात उतरला आहे. त्यात डेव्हिड वॉर्नर, रोव्हमन पॉवेल आणि मुस्तफिझूर रहमान यांचा समावेश आहे .
 
कोलकाता नाईट रायडर्स:  अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (क), सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिक सलाम, वरुण चक्रवर्ती.
 
दिल्ली कॅपिटल्स:  पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (विकेटकीपर आणि कर्णधार), रोवमन पॉवेल, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वेगवान गोलंदाज हर्षल पटेलच्या बहिणीचे निधन, कुटुंबावर शोककळा