आयपीएल 2022 चा 35 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात कोलकाताचा संघ दडपणाखाली असेल, कारण श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरने गेल्या काही सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. त्याचबरोबर गुजरातकडे सलग सामने जिंकण्याचा आत्मविश्वास असेल.
कोलकाता नाईट रायडर्सने 7 पैकी 4 सामने गमावले आहेत. केकेआरने मागील तीन सामने गमावले आहेत.
व्यंकटेश अय्यर, आरोन फिंच, श्रेयस अय्यर (क), नितीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन (विकेटकीपर), सुनील नरेन, पॅट कमिन्स, शिवम मावी, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती असे प्लेइंग 11 असू शकते .
गुजरात टायटन्सबद्दल बोलायचे झाले तर कर्णधार हार्दिक पंड्या पुनरागमन करू शकतो. रशीद खान गेल्या सामन्यात कर्णधार होता.कर्णधार हार्दिक पांड्याला पुनरागमन करणे शक्य दिसत असले तरी तो गोलंदाजी करू शकणार नाही.
रीद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पंड्या (क), डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी अशी प्लेइंग 11 असू शकते.