कोलकाता नाईट रायडर्सने सलग पाच पराभवानंतर पुन्हा विजयाची चव चाखली आहे. कोलकाताने राजस्थानवर सात गडी राखून शानदार विजय नोंदवला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरने राजस्थानने दिलेले 153 धावांचे लक्ष्य तीन गड्यांच्या मोबदल्यात आणि पाच चेंडू शिल्लक असताना सध्या केले.
सलग पाच पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्सने पुन्हा विजयाची चव चाखली आहे. कोलकाताने राजस्थानवर सात गडी राखून शानदार विजय नोंदवला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरने राजस्थानने दिलेले 153 धावांचे लक्ष्य तीन गड्यांच्या मोबदल्यात आणि पाच चेंडू शिल्लक असताना पार केले. या मोसमात केकेआरचा हा चौथा विजय आहे आणि ते आता गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचले आहेत. कोलकातातर्फे नितीश राणा आणि रिंकू सिंग यांनी सामना जिंकणाऱ्या खेळी खेळल्या आणि चौथ्या विकेटसाठी 38 चेंडूत 66 धावांची भागीदारी केली. नितीशने 37 चेंडूत 48 आणि रिंकू सिंगने 23 चेंडूत 42 धावा केल्या. या विजयासह कोलकाता गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे, तर राजस्थान तिसऱ्या स्थानावर आहे.