Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

KKR VS SRH ipl 2022: कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 54 धावांनी पराभव केला

webdunia
शनिवार, 14 मे 2022 (23:22 IST)
kkr vs srh live स्कोअर 2022: कोलकाता नाईट रायडर्सने  शनिवारी एमसीए स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकांत 6 गडी गमावून 177 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादला 20 षटकांत 8 बाद 123 धावाच करता आल्या. 
 
कोलकाताकडून आंद्रे रसेलने 49 धावा केल्या. सॅम बिलिंग्ज ३४ धावा करून बाद झाला. हैदराबादकडून उमरान मलिकने तीन बळी घेतले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना केकेआरने पहिल्या चार षटकांत केवळ 20 धावा केल्या आणि त्याच दरम्यान मार्को येनसेन (30 धावांत 1 बळी) याच्या गोलंदाजीवर व्यंकटेश अय्यरची (7) विकेट गमावली, परंतु नितीश राणा (16 चेंडूत 26, 3) विकेट्स) षटकार, एक चौकार) आणि अजिंक्य रहाणे (24 चेंडूत 28, तीन षटकार) यांनी पुढच्या दोन षटकात 35 धावा करत पॉवरप्लेमध्ये धावसंख्या 55 पर्यंत नेली. उमरानने पहिल्याच षटकात राणा आणि रहाणेला तर दुसऱ्याच षटकात कर्णधार श्रेयस अय्यरला (१५) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. वॉशिंग्टनच्या डावातील शेवटच्या षटकात रसेलने तीन षटकार ठोकले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उद्धव ठाकरे यांनी आज हे 6 टोमणे कोणाला मारले?