रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने IPL 2022 च्या क्वालिफायर-2 मध्ये त्यांचे स्थान निश्चित केले आहे. त्याच वेळी, केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) चा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. एलिमिनेटरच्या सामन्यात आरसीबीने रजत पाटीदारच्या नाबाद 112 धावांच्या जोरावर 4 बाद 207 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौचा संघ 6 बाद 193 धावाच करू शकला. राहुलने 79९ धावा केल्या, पण त्या अपुर्या ठरल्या. हेझलवूडने 3 बळी घेतले. आता RCB संघ 27 मे रोजी अहमदाबाद येथे क्वालिफायर-2 मध्ये राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे. हा सामना जिंकणारा संघ 29 मे रोजी अंतिम फेरीत गुजरात टायटन्सशी भिडणार आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात चांगली झाली नाही. गेल्या सामन्यात नाबाद 140 धावा करणाऱ्या क्विंटन डी कॉकला मोहम्मद सिराजने 5 चेंडूत 6 धावा करून बाद केले. तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या मनन वोहराने 11 चेंडूत 19 धावा केल्या. एक चौकार आणि दोन षटकार मारले. मात्र त्याला आपला डाव मोठा करता आला नाही. त्याला जोस हेझलवूडने बाद केले. 41 धावांवर 2 विकेट पडल्यानंतर केएल राहुल आणि दीपक हुडा यांनी 96 धावांची मोठी भागीदारी केली.