इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) 12 मार्च रोजी संघाच्या नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा करेल. फ्रँचायझीने सोमवारी (7 मार्च) ही माहिती दिली. दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस हा माजी कर्णधार विराट कोहलीच्या जागी संघाचा नवा कर्णधार बनू शकतो. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याआधी या पदासाठी आघाडीवर होता, परंतु डुप्लेसिसचा अनुभव जास्त असल्याचे दिसते.
कोहलीने गेल्या वर्षी आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याने संघाला प्लेऑफपर्यंत नेले. एलिमिनेटरमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला. कोहलीच्या नेतृत्वाखाली, आरसीबीचा संघ 2016 च्या अंतिम फेरीत पोहोचला होता परंतु सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. विराटच्या नेतृत्वाखालील संघाची ती सर्वोत्तम कामगिरी ठरली.
आरसीबी 12 मार्च रोजी दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेत डू प्लेसिसला कर्णधार म्हणून सादर करू शकते. आरसीबी 8 मार्च (मंगळवार) रोजी नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा करेल असे यापूर्वी सांगण्यात आले होते, परंतु फ्रँचायझीने तारीख वाढवली आहे. आरसीबीची नवी जर्सीही 12 मार्चलाच लाँच होणार आहे.