Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 8 March 2025
webdunia

अर्जुन तेंडुलकरचा नाकात बोट घालण्याचा व्हायरल व्हिडिओ फेक, नवी क्लिप बघा

अर्जुन तेंडुलकरचा नाकात बोट घालण्याचा व्हायरल व्हिडिओ फेक, नवी क्लिप बघा
Arjun Tendulkar Viral Video मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात टायटन्स (GT) मंगळवार, 26 एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर IPL 2023 च्या 35 व्या सामन्यात आमनेसामने होते. या सामन्यात गतविजेत्या गुजरातने मुंबईचा 55 धावांच्या फरकाने पराभव केला.
 
दरम्यान या सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू आणि माजी दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर नाकात बोट घालताना दिसत आहे. 
 
व्हायरल (Viral Video) व्हिडिओत अर्जुन नाकात बोट घालताना दिसतो नंतर तेच बोट तो तोंडात घालतो. पण मुळात त्याने आधी आपले नख चावले आणि नंतर बोट नाकात घातले. त्याचा हा प्रकार कॅमेरामनने आपल्या व्हिडिओत कैद केला. पण काहींनी अर्जुनचा हा व्हिडिओ इंटरनेटवर उलट करून शेअर केला आहे.
 
या व्हिडिओत दिसत आहे की त्याने आधी आपले नख चावले आणि नंतर बोट नाकात घातले. कोणी इतकं बारकाईने कॅप्चर करत आहे हे कदाचित अर्जुनला माहीत नसावे. अर्जुनचा हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

JEE Main Result 2023 जेईई मुख्य निकाल घोषित