IPL च्या 59 व्या सामन्यात पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 31 धावांनी पराभव केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले. कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने 20 षटकांत सात गडी गमावून 167 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 136 धावाच करू शकला.
पंजाब किंग्जविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. पंजाबने त्यांना 31 धावांनी पराभूत करून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. त्याचे 12 सामन्यांत आठ गुण आहेत. बाकीचे दोन सामने जिंकले तरी त्याचे फक्त12 गुण होतील. अशा स्थितीत त्याला पुढील फेरी गाठता येणार नाही. दुसरीकडे पंजाबने या विजयासह गुणतालिकेत झेप घेतली आहे. त्याला 12 गुण मिळाले असून तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने 20 षटकांत सात गडी गमावून 167 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 136 धावाच करू शकला. या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांनी लज्जास्पद कामगिरी केली. खराब फलंदाजीमुळेच संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.
पंजाबच्या फिरकी गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत दिल्लीच्या फलंदाजांना खेळपट्टीवर ढेर केले.