Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IPL 2023 : LSG vs PBKS: पंजाब किंग्ज दोन गडी राखून विजयी

IPL 2023 : LSG vs PBKS: पंजाब किंग्ज दोन गडी राखून विजयी
, शनिवार, 15 एप्रिल 2023 (23:49 IST)
आयपीएलच्या 16व्या मोसमातील 21व्या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ लखनऊ सुपर जायंट्ससमोर आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर दोन्ही संघ खेळत आहेत. पंजाब किंग्जचा कार्यवाहक कर्णधार सॅम करणने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचा नियमित कर्णधार शिखर धवन दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाहीये. लखनौने पंजाबसमोर 160 धावांचे लक्ष्य दिले
 
 
आयपीएल 2023 च्या 21 व्या सामन्यात पंजाब किंग्जने लखनौ सुपर जायंट्सचा दोन गडी राखून पराभव केला. लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंजाबसमोर विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य होते, जे तीन चेंडू राखून पूर्ण केले. पंजाब किंग्जच्या विजयाचा हिरो ठरला सिकंदर रझा याने 57 धावांची उत्कृष्ट खेळी. पंजाब किंग्जचा पाच सामन्यांमधला हा तिसरा विजय असून तो गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आला आहे. दुसरीकडे लखनौचा संघ दुसऱ्या स्थानावर कायम आहे. लखनौनेही पाच सामने खेळले आहेत, ज्यात तीन जिंकले आहेत. उत्तम नेट-रनरेटमुळे राजस्थान रॉयल्सचा संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
 
160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली आणि तीन षटकांत दोन गडी गमावले अथर्व तायडेला खातेही उघडता आले नाही, तर प्रभसिमरनने चार धावांचे योगदान दिले. पदार्पण सामना खेळत  असलेल्या युधवीर सिंग चरकने दोन्ही खेळाडूंना बाद केले. दुसरीकडे, मॅथ्यू शॉर्टने काही फटके मारले, 
पण सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर के गौतमने त्याचा डाव संपवला. शॉर्टने 22 चेंडूत 34 धावा केल्या,, ज्यात पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. शॉर्ट बाद झाला तेव्हा पंजाबची धावसंख्या 3 बाद 45 अशी होती. कुरेन बाद झाल्यानंतर काही वेळातच सिकंदर रझाने आपले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा तो पहिला झिम्बाब्वेचा फलंदाज ठरला. संघाची धावसंख्या 139 धावा असताना 18व्या षटकातील पाचव्या चेंडूवर रझा बाद झाला.  रझाने 41 चेंडूत 57 धावा केल्या, ज्यात चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. पंजाबला विजयासाठी शेवटच्या दोन षटकात 20 धावा करायच्या होत्या. अशा स्थितीत शाहरुख खानने काही दमदार फटके मारत संघाला विजय मिळवून दिला. शाहरुखने 10 चेंडूत 23 धावा केल्या, ज्यात दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. 
 
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रयागराजहून मोठी बातमी;गँगस्टर अतिक आणि अशरफची गोळ्या झाडून हत्या