LSG vs MI इंडियन प्रीमियर लीग 2023 : लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा पाच धावांनी पराभव केला. या विजयासह लखनौचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. त्याचवेळी मुंबईसाठी प्लेऑफची शर्यत कठीण झाली आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि लखनौने प्रथम फलंदाजी करताना 177धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ 172धावा करू शकला आणि पाच धावांनी सामना गमावला.
लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा पाच धावांनी पराभव केला. या विजयासह लखनौचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ 172 धावा करू शकला आणि पाच धावांनी सामना गमावला. लखनौकडून मार्कस स्टॉइनिसने सर्वाधिक नाबाद 89 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार कृणाल पंड्याने 49 धावांची खेळी केली. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फने दोन गडी बाद केले.
मुंबईकडून इशान किशनने 59 आणि रोहित शर्माने 37 धावा केल्या. टीम डेव्हिडने नाबाद 32 धावा केल्या. लखनौकडून यश ठाकूर आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.इशान किशनने 34 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.