आयपीएलच्या 46 व्या सामन्यात, मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा सहा गडी राखून पराभव केला. मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर उभय संघांमधील सामना रंगला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने 20 षटकांत 3 बाद 214 धावा केल्या. मुंबईने 18.5 षटकात 4 गडी गमावत 216 धावा करत सामना जिंकला.
मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव करत स्पर्धेतील पाचवा विजय मिळवला. मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी धडाकेबाज खेळी केल्यानंतर टिळक वर्मा आणि टीम डेव्हिड यांनी स्टाईलमध्ये सामना संपवला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने 20 षटकांत 3 बाद 214 धावा केल्या. मुंबईने 18.5 षटकात 4 गडी गमावत 216 धावा करत सामना जिंकला.
मुंबईसाठी इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. इशानने 41 चेंडूत 75 धावा केल्या. त्याने सात चौकार आणि चार षटकार मारले. त्याचवेळी सूर्यकुमार यादवने 31 चेंडूत 66 धावांची खेळी केली. त्याने आठ चौकार आणि दोन षटकार मारले. या दोघांशिवाय टिळक वर्मानेही झटपट धावा करत सामना संपवला. टिळकने 10 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या. त्याने एक चौकार आणि तीन षटकार मारले. टीम डेव्हिडने 10 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 19 धावा केल्या. टिळकने 19व्या षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून सामना संपवला.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासाठी हा सामना खास होता. मुंबईसाठी रोहितचा हा 200 वा सामना होता, पण तो फलंदाजीने खास बनवू शकला नाही. तीन चेंडूंचा सामना केल्यानंतर रोहित ऋषी धवनचा बळी ठरला. मात्र, संघाने सामना जिंकून रोहितला या खास प्रसंगी एक अप्रतिम भेट दिली.