rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

SRH vs LSG Playing-11: हेनरिक क्लासेन, मार्को जॅन्सन देखील हैदराबाद संघात सामील, प्लेइंग 11 जाणून घ्या

SRH vs LSG Playing 11 IPL 2023   Henrik Klaasen  Marco Jansson  in Hyderabad squad   Lucknow Supergiants vs Sunrisers Hyderabad  Match today
, शुक्रवार, 7 एप्रिल 2023 (16:00 IST)
IPL 2023 च्या 10 व्या सामन्यात आज लखनौ सुपरजायंट्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. लखनौच्या होम ग्राउंड एकना स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून हा सामना खेळवला जाईल. चेन्नई सुपर किंग्जकडून शेवटचा सामना हरल्यानंतर लखनौचा संघ येथे पोहोचला, तर सनरायझर्स हैदराबादला शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध 72धावांनी पराभव पत्करावा लागला. दोन्ही संघांना त्यांचे मागील पराभव विसरून नव्याने सुरुवात करायची आहे. 4 एप्रिल 2022 रोजी, लखनौ सुपरजायंट्सने मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 12 धावांनी पराभव केला.
 
दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एडन मार्करामला या मोसमासाठी सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद देण्यात आले आहे.आता मार्कराम संघात परतला असून तो संघाच्या फलंदाजीचा महत्त्वाचा भाग असेल
 
हैदराबादच्या सर्व फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. त्याचबरोबर मार्कराम फजलहक फारुकीच्या जागी संघात येऊ शकतो. अशा स्थितीत टी नटराजन यांना संधी दिली जाऊ शकते. 
दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज आणि यष्टीरक्षक क्विंटन डिकॉकही लखनऊ संघात परतला आहे. अलीकडेच त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20I मध्ये धडाकेबाज शतक झळकावले आहे.
 
दोन्ही  संघातील संभाव्य खेळणारे 11 :
लखनौ सुपरजायंट्स दोन्ही संघातील संभाव्य खेळणारे 11 : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डिकॉक, दीपक हुडा, क्रुणाल पंड्या, मार्कस स्टोइनिस / काइल मायर्स, निकोलस पूरन, आयुष बडोनी, रवी बिश्नोई, मार्क वुड, जयदेव उनाडकट / यश ठाकूर, आवेश खान. 
 
सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (क), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, मार्को जॅन्सन/आदिल रशीद, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन.
 
 Edited By - Priya Dixit   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा Ambedkar Jayanti Wishes 2023 Marathi