Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आज राजस्थान-हैदराबाद लढत

आज राजस्थान-हैदराबाद लढत

वेबदुनिया

WD
17 मे रोजी येथील राजीव गांधी स्टेडियम, उप्पुल येथे यजमान सनराझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या संघात सहाव्या आयपीएल स्पर्धेतील 68 वा ट्वेंटी-20 साखळी क्रिकेट सामना खेळला जात आहे.

राजस्थान संघाने 15 सामन्यातून 10 विजयांसह 20 गुण मिळविले आहेत व त्यांनी प्ले ऑफ फेरी पक्की केलेली आहे. परंतु, त्यांना क्वॉलिफायरमध्ये खेळावयाचे असेल तर त्यांना हैदराबादविरुद्ध विजय मिळविणे आवश्यक आहे. ते जर विजय मिळवू शकले नाहीत, तर त्यांना एलिमिनेटर फेरीत खेळावे लागण्याची शक्यता आहे.

हा सामना खेळण्यापूर्वी राजस्थान रॉल्सच खेळाडूंना व संघमालकांना जोरदार धक्का बसला आहे. दिल्ली पोलिसांनी काल रात्री राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंथ याला अटक केली आहे. तर अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या दोन खेळाडूंना मुंबई येथे मुंबईविरुद्धचा साखळी सामना संपल्यानंतर हॉटेलमध्ये अटक करण्यात आली आहे. या तीन खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप ठेवण्यात आला आहे व क्रिकेट मंडळाने त्यांना बडतर्फही केले आहे.

बुधवार रात्री मुंबईने राजस्थान रॉयल्सवर 14 धावांनी विजय मिळविला आणि क्वॉलिफायर फेरीत खेळण्याची पात्रता मिळविली. वॅटसन हा त्याच्या म्हणण्याप्रमाणे राजस्थानला हा सामना जिंकून देऊ शकला नाही. हैदराबादचेसुद्धा 16 गुण झालेले आहेत. हा सामना धरून त्यांना दोन सामने खेळावयाचे आहेत. त्यांनी दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे जास्तीत जास्त 18 गुण होऊ शकतात. आयपीएलमधील या सत्रात हैदराबादच्या संघात उत्तम गोलंदाज आहेत व त्यांचे आक्रमण प्रभावी आहे. वेगवान डेल स्टेन, इशांत शर्मा, वेस्ट इंडीजचा कर्णधार डॅरेन सॅमी, लेगस्पिनर अंकित मिश्र, श्रीलंकेचा थिस्सारा परेरा आणि फॉर्ममध्ये असलेला फिरकी गोलंदाज करन शर्मा हे सक्षम गोलंदाज आहेत.

मुंबईने त्यांच्याविरुद्ध खेळताना विजय मिळविला होता. परंतु पोलार्डने आक्रमक फलंदाजी करून मुंबईला 7 गडी राखून विजय मिळवून दिला होता. सुरेश रैना व माईक हसीने हैदराबाद संघाला मागे नमविले होते. 27 एप्रिल रोजी राजस्थानने त्यांच्या घरच्या मैदानावर हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला होता. हैदराबादला या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकण्याचा निर्धार राजस्थानच्या खेळाडूंनी केला आहे. त्यामुळे हा सामना अत्यंत चुरशीचा ठरण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi