Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हैदराबाद-मुंबई संघात आज महत्त्वाची लढत

हैदराबाद-मुंबई संघात आज महत्त्वाची लढत

वेबदुनिया

WD
येथील वानखेडे स्टेडिमवर यजमान मुंबई इंडियन्स आणि सनराझर्स हैदराबाद या संघात आयपीएल स्पर्धेतील ट्वेंटी-20 चा महत्त्वपूर्ण साखळी क्रिकेट सामना खेळला जात आहे. दोन्ही संघाला विजय आवश्क बनला आहे.

मुंबई इंडियन्सने शनिवारी रात्री पुणे वॉरिअर्सचा पाच गडी राखून चित्तथरारकरीत पराभव केला. मुंबईने हा नववा विजय मिळविला. त्यामुळे मुंबईची अंतिम चार संघात स्थान मिळविण्याची आशा पल्लवित झाल्या आहेत. मुंबईने 13 सामने खेळले असून आता त्यांचे तीन सामने शिल्लक आहेत. तीनपैकी एक विजय मिळविला तरी मुंबईची प्ले ऑफ फेरी निश्चित होणार आहे. याउलट, हैदराबादने शनिवारी पंजाब संघाला 30 धावांनी पराभूत केले. त्यांनी आठवा विज मिळवून 16 गुणांसह साखळी गुणतक्त्यात सहावे स्थान मिळविले आहे.

गुणतक्त्याचा विचार केला तर चेन्नईचा संघ 20 गुणांसह अव्वलस्थानी आहे. प्रत्येकी 18 गुणांसह मुंबई दुसर्‍या स्थानावर तर राजस्थान तिसर्‍या स्थानावर आहे. बंगळुरू आणि हैदराबादचे संघ प्रत्येकी 16 गुणांसह चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत. प्रत्येक संघाचे तीन सामने खेळावयाचे शिल्लक आहेत. त्यामुळे, सर्व संघातील चुरस कायम राहिली आहे. हैदराबाद संघ मुंबईपेक्षा दोन गुणानी पिछाडीस आहे. मुंबई संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होत आहे. प्रत्येक संघ आपल्या घरच्या मैदानावर 8 सामने खेळू शकतो. मुंबईने वानखेडे स्टेडिमवर 6 सामन्यातून 6 विजय मिळविलेले आहेत व हा क्रम पुढे चालू ठेवण्याचा मुंबई संघाचा निर्धार राहील.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा संघ प्रगती करत आहे. मुंबईची आघाडीची फळी बहुतांशी सामन्यात उत्तम सलामी देऊ शकली नाही. पुण्याविरुद्ध ड्वेन स्मिथ शून्यावर बाद झाला. तरीही उर्वरित फलंदाजांनी मुंबईला विजय मिळवून दिला. रोहित शर्माने सामन्यात 36 धावा काढल्या. दिनेश कार्तिकही फार्ममध्येआहे. पोलार्डसुद्धा पिछाडीस नाही. अंबाटी राडू हा मधल्या फळीत धावा जमवत आहे. रोहितने 467 तर दिनेश कार्तिकने 405 धावा काढल्या आहेत. गोलंदाजीत मिशेल जॉन्सनने 19 बळी मिळविले आहेत. लसिथ मलिंगानेही 11 गडी बाद केले आहेत. हरभजनसिंगने 17 तर ओझाने 14 गडी टिपले आहेत. मुंबईचा संघ संतुलित असून तो विजासाठी प्रयत्न करेल. परंतु, त्यासाठी त्यांना स्टेन, परेरा, अमित मिश्रा यांच्या सामना करावा लागेल. विजयासाठी दोन्ही संघ आसुसलेले असून ही लढत रंगतदार ठरणची शक्यता आहे. सामन्याची वेळ : रात्री 8 वाजता

Share this Story:

Follow Webdunia marathi