Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अविश्वसनीय खेळ्या करण्यात परदेशी क्रिकेटपटू माहिर

अविश्वसनीय खेळ्या करण्यात परदेशी क्रिकेटपटू माहिर
, मंगळवार, 14 मे 2013 (18:03 IST)
नवी दिल्ली. आयपीएलच्या सद्या सुरू असलेल्या सहाव्या हंगामात सामना जिंकून देणार्‍या अविश्वसनीय इनिंग खेळण्यात परदेशी खेळाडूंनी भारतीयांना पछाडले आहे.

WD


ख्रिस गेल, डेव्हिड मिलर, शेन वाटसन, कीरोन पोलार्ड आणि एबी ‍डी'विलियर्स यांनी असल्या चमत्कारिक इनिंग्ज खेळल्या की प्रेक्षकांच्या मनावर त्या कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.

भारतीय खेळाडू विराट कोहली, सुरेश रैना, मनविंदर बिस्ला, दिनेश कार्तिक व रोहित शर्मा यांनीही दमदार इनिंग्ज खेळल्या मात्र त्यांच्या प्रभाव भयंकर नव्हता.

या हंगामातील पहिल्या तीन इनिंग्ज परदेशी खेळाडूंच्या नावे आहेत. ख्रिस गेलच्या मुसळधार 175 धावा, डेव्हिड मिलरच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 101 धावा आणि वाटसनचे तुफानी शतक अजूनही विसरणे शक्य नाही.

गेलने पुणे संघाविरुद्ध 66 चेंडूत 175 धावा तडकवल्या होत्या. मिलरने बेंगळुरूविरूद्ध 38 चेंडूत नाबाद 101 धावा करत पंजाबला अविश्वसनीय विजय मिळवून दिला होता. वाटसनने चेन्नईविरुद्ध 61 चेंडूत तडाखेबंद शतक झळकवले होते.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi