इंडियन प्रिमियर लीगच्या द्वितीय मालिकेसाठी एका बॉलीवूड स्टारचा शोध घेतला जात असून त्यात रईसा गोगाची मुंबई इंडियन्सने तर जसमीता चौहानची राजस्थान रॉयल्सने निवड केली.
रईसा व जसमीता या दोनही तरूणीची काल (दि.18) झालेल्या सामन्या दरम्यान हजारो संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकामधून निवड झाली.
'मिस बॉलीवूड' या स्पर्धे दरम्यान दक्षिण आफ्रिकेत अशा सुंदरीची निवड केली जाणार आहे की, तिच्या अंगी स्टार बनण्याचे गुण आहेत.
निवड झालेल्या 'मिस बॉलीवूड'ला एका भारतीय चित्रपटात भूमिका, भारतीय यात्रेसाठी बिजनेस क्लासचे तिकिट व 50 हजार रॅडचा रोख पुरस्कार दिले जातील. आठ शहरातील ऐकूण 50 'मिस बॉलिवूड' निवडल्या जातील.