दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने राजस्थान रॉयल्सचे तीन क्रिकेटपटू एस. श्रीसंथ, अंकित चौहान व अजीत चंडीला यांच्यासहित सात बुकीजना आयपीएल मध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपात अटक केली आहे. टी-20 लीग स्पर्धेवर हा काळा डाग असून आयपीएलमध्ये सुरुवातीपासूनच त्रुटी पाहत असलेल्यांना विरोध करण्याचा आणखी एक मुद्दा मिळाला आहे.अटक करण्यात आलेल्या तीनही खेळाडूंनी मोहाली व मुंबईत खेळण्यात आलेल्या सामन्यांमध्ये स्पॉट फिक्सिंग केली होती. मुंबईत बुधवारी राजस्थान व मुंबईदरम्यान लढत झाली, यामध्ये आरोपींपैकी फक्त अंकित चौहानच खेळला होता.
कसे पकडण्यात आले आरोपी क्रिकेटपटूंना...
दिल्ली पोलिसांनी इतक्यात काही बुकींजना विचारपूस केली होती, यामधून त्यांना स्पॉट फिक्सिंगची शंका आली. यानंतर संबंधीत क्रिकेटपटूंवर नजर ठेवण्यात आली. त्यांचे फोन कॉल्स टेप केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दिलीचे पोलिस आयुक्त नीरज कुमार यांच्यानुसार बुकीज तीनही खेळाडूंसोबत स्पॉट फिक्सिंग करत होते व नंतर अंडरवर्ल्डच्या लोकांना माहिती देऊन त्यावर सट्टा चालवण्यात येत होता. आणखी काही क्रिकेटपटूंचाही यात समावेश असण्याची शक्यता आहे.
कसे झाले स्पॉट फिक्सिंग...
बुधवारी मुंबई व राजस्थान दरम्यान खेळण्यात आलेल्या सामन्यात अंकित चौहानने फिक्सिंग केली होती. पोलिस आयुक्तांनुसार स्पॉट फिक्सिंग एखाद्या षट्कात निश्चित धावा देणे, वाइड किंवा नो बॉल टाकणे यासारख्या गोष्टींशी जुळलेले आहे. ज्या षट्कात असे करारयचे होते त्याअगोदर विशेष प्रकारचे इशारे, कसरत, सारखा घाम पुसणे यासारख्या गोष्टी केल्या जायच्या.
कालच्या सामन्यात अंकित चौहानने डावाच्या तिसर्या षट्कात 15 धावा दिल्या. याअगोदर त्याने डावाच्या पहिल्या षट्कात फक्त 2 धावा दिल्या होत्या. तिसर्या षट्काची सुरूवातच त्याने आखूड चेंडूने केली, ग्लेन मॅक्सवेलने त्यावर षट्कार खेचला.