Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोलकाता आणि पुणे संघात आज लढत

कोलकाता आणि पुणे संघात आज लढत

वेबदुनिया

WD
यजमान कोलकाता नाईट राडर्स आणि पुणे वॉरिअर्स इंडिय या दोन संघात बुधवार 15 मे रोजी झारखंड येथील क्रिकेट मैदानावर आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील ट्वेंटी-20 साखळी क्रिकेट सामना खेळला जात आहे.

हा सामना म्हणजे लुटुपुटूचा समजला तरी चालेल. कारण, कोलकाता आणि पुणे संघ हे या हंगामातील आयपीएलची प्ले ऑफ फेरी गाठू शकत नाहीत, हे स्पष्ट झालेले आहे. कोलकाताने 14 सामन्यातू 6 विजय, 8 पराभवांसह 12 गुण वसूल केले आहेत व हा संघ सहाव्या स्थानांवर आहे. पुणे संघ 14 सामन्यातून फक्त दोन विजय मिळवू शकला आहे. त्यांनी 12 पराभव पत्करले आहेत. 4 गुणांसह हा संघ शेवटच्या स्थानावर आहे.

रॉयल चॅलेंजर्स व सनराझर्स हैदराबाद यांचे प्रत्येकी 16 गुण झालेले आहेत. हे दोन्ही संघ उर्वरित दोन-दोन सामने हरतील व कोलकाता संघ जिंकेल, अशा आशेवर आमच्या संघाला प्ले ऑफ फेरी गाठण्याची संधी आहे, असे कालिसने म्हटले होते. परंतु, ही अशक्यप्राय अशी गोष्ट आहे. मुंबई, चेन्नई आणि राजस्थान या तीनही संघानी प्रत्येकी 20 गुणांसह प्ले ऑफ फेरी पक्की केलेली आहे. चौथ्या स्थानासाठी बंगळुरू आणि हैदराबाद संघात चुरस आहे. कोलकाता संघाने 12 मे रोजी याचठिकाणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 5 गडी राखून पराभव केला होता. पुणे वॉरिअर्स संघावर पुणे येथे 9 मे रोजी कोलकाता संघाने 46 धावांनी विजय मिळविला होता.

एकंदरीत गौतम गंभीरचा संघ हा पुण्यापेक्षा प्रबळ वाटत आहे. अष्टपैलू जॅक कालिस आणि सुनील नरीन या दोघांनी पुण्याविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. तसेच, या दोघांनी कोलकाता संघाला बंगळुरूविरुद्ध विजय मिळवून दिला होता. हे दोन्ही संघ प्रतिष्ठेसाठी खेळत आहेत. या सामन्यातसुद्धा नाणेफेक जिंकणे हे महत्त्वाचे ठरेल, असे मत बिहार रणजी संघाचे माजी कर्णधार आदिल हुसेन यांनी सांगितले.

सामन्याती वेळ : दुपारी 4 वाजता.

Share this Story:

Follow Webdunia marathi