Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ख्रिस गेलवर महानायक फिदा

ख्रिस गेलवर महानायक फिदा

वेबदुनिया

WD
कॅरेबियन स्टार ख्रिस गेलच्या वादळी खेळाने पुणे वॉरियर्स संघाची काल झोप उडाली असताना क्रिकेटवर भरभरुन प्रेम करणा-या चाहत्यांनी मात्र गेलला सलाम केला आहे. क्रिकेटचे जबरदस्त फॅन असलेल्या महानायक अमिताभ बच्चन यांनी तर आपण अशाप्रकारे गोलंदाजीची कत्तल कधीच पाहिली नाही, असे म्हणत गेलची तोंडभरुन स्तुती केली आहे.

या सामन्यात अवघ्या ३० चेंडूत शतक झळकावून गेलने क्रिकेटच्या आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत वेगवान शतकाची नोंद केली. पहिल्या षटकापासून सुसाट सुटलेला गेल शेवटच्या षटकापर्यंत पुण्यासाठी संकट होऊन उभा होता. त्याने तब्बल १७ षटकार ठोकले. खुद्द कर्णधार विराट कोहली यानेही लवून नमस्कार करत गेलच्या खेळीला दाद दिली होती. या खेळीने गेल क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईतच बनला असून ट्विटर, फेसबुकवर त्याच्या स्फोटक खेळीवर प्रतिक्रियांचा खचच पडला आहे. त्यात महानायक बच्चन यांनी गेलसाठी स्पेशल ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्यात.गेलची कालची वादळी खेळी मी पाहिली आणि भारावूनच गेलो. आज पुन्हा ही अविस्मरणीय खेळी पाहण्याचा मोह मला आवरता आला नाही. खरंच अशी गोलंदाजीची कत्तल मी तरी कधीच पाहिलेली नाही,अशी दाद ट्विटच्या माध्यमातून अमिताभने गेलला दिलीय.

Share this Story:

Follow Webdunia marathi