Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चेन्नई सुपर किंग्ज अंतिम फेरीत

चेन्नई सुपर किंग्ज अंतिम फेरीत

भाषा

मुंबई , शनिवार, 31 मे 2008 (23:51 IST)
आयपीएलच्या उपांत्य फेरीतील सामन्यात आज मुंबई येथे झालेल्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने पंजाब इलेव्हन संघाचा पार धुव्वा उडवत नऊ गडी राखून सहज विजय प्राप्त केला. या विजयामुळे चेन्नई संघाने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला असून आता त्यांची लढत शेन वॉर्नच्या राजस्थान रॉयल्स संघाबरोबर उद्या (दि.1 जून) आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय युवराजसिंगला महागात पडला. पंजाब इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना आठ गडी गमावून केवळ 113 धावांचे आव्हान चेन्नई सुपर किंग्जपुढे विजयासाठी ठेवले होते. परंतु, या धावा करताना पंजाब संघाची दमछाक झाली होती. कारण, सर्व फलंदाज एकामागून एक असे तंबूत परतत होते. कर्णधार युवराजसिंगलाही आज सूर गवसला नाही.

पंजाब संघाने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जने एक गडी गमावून केवळ 14.5 षटकात 116 धावा केल्या. युवा खेळाडू पार्थिव पटेलने आक्रमक खेळ करत 48 चेंडूत आठ चौकार व आठ षटकाराच्या मदतीने आयपीएलमधील आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले.

पार्थिव पटेलच्या जोडीला मैदानात उतरलेल्या सुरेश रैनानेही आज आक्रमक फलंदाजी केली. त्याने 34 चेंडूत चार चौकार व चार षटकारच्या मदतीने आपले अर्धशतक (55) पूणे केले. या जोडीने 110 धावांची भागिदारी करून इतर खेळाडूंना खेळण्याची संधीच दिली नाही.

'मॅन ऑफ द मॅच' च्या पुरस्काराने मखाना नतिनीला सन्मानित करण्यात आले. त्याने अत्यंत महत्त्वाच्या दोन बळी मिळवून पंजाब संघाला झटका दिला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi