Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तिकीट विक्रीवर एमसीएचे अधिकारी नाराज

तिकीट विक्रीवर एमसीएचे अधिकारी नाराज

भाषा

मुंबई , मंगळवार, 27 मे 2008 (19:21 IST)
इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) धनिकांची स्पर्धा असली तरी त्यांनी प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यश मिळविले आहे. परंतु, मुंबई क्रिकेट असोशिएशनचे (एमसीए) अधिकारी सामन्यांच्या तिकीट विक्रीबद्दल नाराज आहेत.

डी. वाय. पाटील स्टेडियमच्या अधिकार्‍यांनी पाठविलेल्या एका पत्रामुळे मुंबई क्रिकेट संघांच्या व्यवस्थापक समितीचे सदस्य नाराज आहेत. या स्टेडियममध्ये एक जूनला होणारा अंतिम सामना आयोजित करण्यात आला आहे.

अंतिम सामन्यासाठी एमसीएच्या अधिकार्‍यांना आणि समितीच्या सदस्यांना एकही तिकीट किंवा पास देऊ शकणार नसल्याचे या पत्रात म्हटले आहे.

यापूर्वी झालेल्या सामन्यांच्या तिकीट विक्रीतून व्यवस्थापक समितीच्या प्रत्येक सदस्याला एक आणि अधिकार्‍यांसाठी दोन तिकीटे दिले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi