दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरीत झालेल्या इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) दुसर्या मालिकेच्या पहिल्या दिवशी होणार्या दोन सामन्याचे सर्व ऑनलाइन तिकिटे काही तासातच विक्री झाली.
आयपीएलच्या दुसर्या मालिकेला येत्या 18 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. पहिल्या दिवशी कॅपटाउनमध्ये दोन सामने खेळले जातील. कॅपटाउनमध्ये दि. 19 एप्रिलला होणार्या दोन ही सामन्याचे कुठलेच तिकिट शिल्लक नसल्याचे आयोजकानी सांगितले. आयपीएलच्या ऑनलाइन तिकिट विक्रीवर प्रतिक्रिया देताना आयपीएलचे आयुक्त ललीत मोदी यांनी सांगितले की, ट्वेंटी-20 लीगची सुरवात स्मरणात राहण्यासाठी आहे.
पहिल्या दिवशी गत वर्षीचा उपविजेता चेन्नई सुपरकिंग्स व मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होईल. त्यानंतर चॅम्पियन राजस्थान रॉयल्सला बेगलौरू रॉयल चॅलेंजर्सचा सामना करावा लागेल. तसेच 19 एप्रिलला दिल्ली डेयरडेविल्सची लढत किंग्स इलेवन पंजाबशी होईल तर डेक्कन चार्जर्स व कोलकत्ता नाइटराइडर्स हो दोघी संघ आमने सामने राहतील.