Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फायनलमध्ये दुखापतग्रस्त स्मिथऐवजी युनूस?

फायनलमध्ये दुखापतग्रस्त स्मिथऐवजी युनूस?

एएनआय

मुंबई , रविवार, 1 जून 2008 (19:14 IST)
चेन्नईविरूद्धच्या अंतिम संग्रामात दुखापतग्रस्त ग्रॅमी स्मिथ ऐवजी राजस्थान रॉयल्स संघात युनूस खानचा समावेश होण्याची शक्यता आहे. सलामीस स्वप्नील असनोडकरसोबत कुणास पाठवावे, हा प्रश्न संघव्यवस्थापनासमोर उभा ठाकला आहे. यासाठी युनूस खान व कामरान अकमल हे दोन पर्याय असल्याचे कर्णधार शेन वॉर्नने सांगितले.

युनूसने आयपीएल स्पर्धेत खेळलेल्या एका सामन्यातून तीन धावा केल्या आहेत, तर कामरानने पाच सामन्यातून एकशे बावीस धावा फटकवल्या आहेत. दिल्लीविरूद्धच्या उपांत्य सामन्यात स्मिथ जायबंदी झाला होता.

असनोडकर सोबत तो डावाची सुरूवात करत होता. अकरा सामन्यातून त्याने तब्बल 441 धावा कुटल्या असून सर्वाधिक 91 धावांची तडाखेबंद खेळीही त्याने केली आहे.

फायनलसारख्या महत्त्वपूर्ण सामन्यात स्मिथची अनुपस्थिती राजस्थानसाठी चिंताजनक ठरू शकते. नवी मुंबईतील डी वाय पाटील मैदानावर अंतिम सामना रंगणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi