इंडियन प्रीमियल लीग (आयपीएल) दरम्यान इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू एंड्रयू फ्लिंटाफ भारतीय खेळाडूंवर लक्ष ठेवणार आहे. त्याचा उपयोग जून महिन्यात होणार्या आयसीसीचा ट्वेंटी-20 विश्वचषकासाठी करणार आहे.
फ्लिंटाफने सांगितले की, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटला खूप महत्व येत असल्याने जूनमहिन्यात होणारा विश्वचषक खूप महत्वाचा ठरणार आहे. यामुळे सामन्या दरम्यान मी भारताच्या काही खेळाडूंशी चर्चा करेल. त्यामुळे त्यांच्या डोक्यात काय चालले आहे त्याची माहिती मला मिळेल.