Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सनरायझर्स- वॉरीयर्सची टक्कर

सनरायझर्स- वॉरीयर्सची टक्कर

वेबदुनिया

WD
नव्या स्वरूपात अवतरलेला सनयझर्स हैदराबाद संघ आणि पुणे वारियर्स दरम्यान आज लढत होत आहे.सनरायडर्स पूर्वीचे नाव डेक्कन चार्जर्स असे होते.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटीत पदार्पणात सर्वाधिक वेगवान शतक ठोकणा-या शिखर धवनची अनुपस्थिती हैदराबाद संघाला जाणवणार आहे. धवन हाताच्या दुखापतीतून अजून सावरलेला नाही. संघाचे नेतृत्व कुमार संगकाराकडे आहे. माजी कसोटीपटू के. श्रीकांत आणि व्हीव्हीएस लक्ष्मण संघाचे मार्गदर्शक, ऑस्ट्रेलियाचा टॉम मुडी मुख्य कोच तर पाकचा वकार युनूस बोलिंग कोच आहे. फलंदाजीचा भार संगकारा, द. आफ्रिकेचा जे.पी.डुमिनी, श्रीलंकेचा थिसारा परेरा, ऑस्ट्रेलियाचा कॅमेरॉन व्हाईट आणि पार्थिव पटेल सांभाळतील.इशांत शर्मा, लेगस्पीनर अमित मिश्रा, नाथान मॅक्युलम हे गोलंदाज आहेत. पुणे वॉरियर्सचे नेतृत्व श्रीलंकेच्या अ‍ॅन्जेलो मॅथ्यूजकडे आहे. ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क मूळ कप्तान होता परंतु तो जखमी असल्याने त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. युवराजसिंगसारखा स्फोटक फलंदाज या संघात आहे.अजंता मेंडीस, रॉस टेलर, अभिषेक नायरमुळे संघ मजबूत बनला आहे. जम्मू आणि काश्मीरचा अष्टपैलू परवेज रसूल पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. नायरसाठी ६ लाख ७५ डॉलर्स मोजण्यात आले आहेत.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-

सनरायझर्स हैदराबाद : संगकारा (कर्णधार), अक्षय रेड्डी, अमित मिर्झा, आनंद राजन, अंकित शर्मा, आशिष रेड्डी, बिपलाश सामंत्रे, कॅमेरॉन व्हाईट, ख्रिस्त लीन, डेल स्टेन, डॅरन सामी, रवी तेजा, एच.विहारी, इशांत शर्मा, नाथान मॅक्युलम, पार्थिव पटेल, प्रशांत पद्मनाथन, क्वींटन, सचिन राणा, एस.धवन, सुदीप त्यागी, टी. सरगुनम, थिसारा परेरा, वीर प्रताप सिंग.

पुणे वारीयर्स : अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (कर्णधार), अभिषेक नायर, अजंता मेंडीस, अली मुर्तजा, अनुष्टुप मझुमदार, अशोक डिंडा, भुवनेश्वर कुमार, धीरज जाधव, द्विवेदी, हरप्रीत सिंग, ईश्वर पांडे, के. रिचर्डसन, के. उपाध्याय, ल्युक राईट, महेश रावत, मनीष पांडे, मार्लन सॅम्युएल्स, मिचेल मार्श, मिथून मन्हास, परवेज रसूल

Share this Story:

Follow Webdunia marathi