कर्णधार एडम गिलक्रिस्ट (71) आणि युवा फलंदाज रोहित शर्मा (52) यांच्या धमाकेदार अर्धशतकांच्या बळावर हैदराबादने बंगळुरूचा बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात 24 धावांनी पराभव केला. गिलक्रिस्टने केवळ 45 चेंडूंमध्ये सहा षटकार व पाच षटकार ठोकून 71 धावा केल्या. तर रोहितने 30 चेंडूत एक चौकार व पाच षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या.