Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आज पंजाबपुढे मुंबईचे आव्हान

आज पंजाबपुढे मुंबईचे आव्हान

वेबदुनिया

WD
पंजाब संघ आणि बलवान मुंबई इंडिन्स यांच्यामध्ये शनिवार 18 मे रोजी सहाव्या आयपीएल स्पर्धेतील ट्वेंटी-20 साखळी क्रिकेट सामना येथे खेळला जात आहे.

पंजाबसाठी हा सामना म्हणजे जिंकू किंवा मरू अशा स्थितीचा राहील. 15 सामन्यातून पंजाबचे 14 तर मुंबईचे 22 गुण झालेले आहेत. मुंबईच्यादृष्टीने या स्पर्धेत साखळीत अव्वलस्थान मिळविणे महत्त्वाचे राहणार आहे. मुंबईने राजस्थान रॉलसारख्या संघाचा 14 धावांनी पराभव केला. त्याळे मुंबई संघाला हरविणे कठीण जाणार आहे. मुंबईने प्ले ऑफ फेरी गाठली असून आणखी एक विजय मिळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहील.

पंजाबने हा सामना जिंकला तर त्यांचे 16 गुण होतील आणि बंगळुरू, हैदराबाद संघ हरले तर त्यांचेही प्रत्येकी 16 गुण राहतील. सरस धावगतीवर चौथा संघ प्ले ऑफ फेरी गाठू शकेल, अशी आशा पंजाब संघाला वाटत आहे. परंतु त्यांच्यापुढे मुंबईला नमविणे हे खडतर आव्हान उभे आहे. रोहित शर्माच्या संघाने घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडे स्टेडिमवर आठही साखळी सामने जिंकलेले आहेत. मुंबईकडे तेंडुलकर, ड्वेन स्मिथ, आदित्य तारे, रोहित शर्मा, अंबाटी रायुडू, केरॉन पोलार्ड असे एकापेक्षा एक सरस फलंदाज आहेत. त्याचप्रमाणे मलिंगा, धवल कुलकर्णी, हरभजनसिंग, प्रगन ओझा, मिशेल जॉनसन असे गोलंदाज आहेत.

पंजाबकडे कर्णधार गिल ख्रिस्ट, मनदीपसिंग, ओमेरबॅच, डेव्हीड मिलेर, मनन वोहरा, पियुष चावला, अझहर महामूद, परवींदर आवाना असे फलंदाज व गोलंदाज आहेत. पंजाब संघही संतुलित आहे. धर्मशाला येथील खेळपट्टी फलंदाज व गोलंदाजांना समसमान देणारी आहे. दोन्हीही संघ विजयाचे प्रयत्न करत असल्यामुळे हा सामनासुद्धा अटीतटीचा ठरण्याशी शक्यता नाकारता येत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi