Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयपीएल कसोटी व वनडेसाठी धोक्याची घंटा?

आयपीएल कसोटी व वनडेसाठी धोक्याची घंटा?

भाषा

नवी दिल्ली , सोमवार, 2 जून 2008 (22:53 IST)
ट्वेंटी क्रिकेटच्या इंडीयन प्रिमियर लीग स्पर्धेस अपेक्षेबाहेर यश मिळाल्याने कसोटी व एकदिवसीय क्रिकेटच्या भवितव्यावर परिणाम होणार काय? दोन्ही प्रकारच्या खेळाच्या लोकप्रियतेवर ट्वेंटीचा परिणाम होईल काय, यावर खेळाडूंमध्ये मतभेद आहेत. मात्र ट्वेंटी प्रसिद्धीच्या शिखरावर चढल्यानंतरही कसोटीच्या करिश्म्याशी बरोबरी‍ करू शकणार नाही, याबाबत त्यांच्यात एकमत आहे.

आयपीएल स्पर्धेत सर्वच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा समावेश असावा यासाठी आयसीसीच्या वेळापत्रकात घुसखोरीस सुरूवात झाली आहे. मात्र याचा एकदिवसीय व कसोटी क्रिकेटवर काय परिणाम होईल, याबाबत खरा चिंतेचा प्रश्न आहे.

माजी कसोटीपटू इम्रान खान व वसिम अक्रम यांना आयपीएलसारख्या स्पर्धांमुळे चाहते कसोटीस अडगळीत टाकतील याची भिती वाटते, मात्र मार्टीन क्रो व सचिन तेंडुलकरच्या मते ट्वेंटीचा विस्तार झाल्यास क्रिकेटला खर्‍या अर्थाने जागतिक अधिष्ठान लाभेल.

इम्रानला ट्वेंटीची संकल्पनास पसंत नसल्याचे तो चिंता व्यक्त करतो. अक्रमच्या मते ट्वेंटी मधून झटपट पैसे कमावण्यासाठी क्रिकेटपटू कारकीर्दीत लवकर निवृत्ती घेऊ शकतात. कसोटी क्रिकेट या वादळास थोपऊ शकले मात्र एकदिवसीय क्रिकेट या वादळास समर्थपणे टोलवून लाऊ शकेल, असा प्रश्न तो करतो.



Share this Story:

Follow Webdunia marathi