इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) दुसर्या मालिकेला ग्रहन लागले असून एका मागून एका वादाच्या भोवर्यात सापडत आहे. आता आयोजक व क्रिकेट दक्षिण आफ्रिका यांच्यात ट्वेंटी.20 टूर्नामेंट दरम्यान आठही स्टेडियमवरच्या भव्य खोल्याचा वाद चव्हाट्यावर आला आहे. परंतु हा वाद लवकर मिटवण्यासाठी आयोजक प्रयत्न करत आहे.
वाद केव्हा निर्माण झाला, हे मात्र कळू शकले नाही. स्टेडियमच्या सुइट्सच्या मालकाना आयपीएलच्या सामन्यात मोफत प्रवेश दिला जाणार नाही, असे आयोजकाचे म्हणणे आहे.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकाचे मुख्य कार्यकारी गेराल्ड माजोला यांनी सांगितले की, याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून लवकरच यावर मार्ग काढला जाणार आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाची यासंदर्भात आयपीएल आयोजकाशी चर्चा सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेत आयोजित केलेली आयपीएलची दुसरी मालिका ये त्या 18 एप्रिलपासून सुरू होत असून प्रिटोरिया, जोहानिसबर्ग, केप टाउन, पोर्ट एलिजाबेथ, ईस्ट लंदन, डरबन, ब्लोमफोंटेन व किंबरले येथील स्टेडियमवर सामने खेळले जातील.