इंडियन प्रिमीयर लीगच्या सोमवारी झालेल्या मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर मिळालेला विजय हा आपल्या वीस वर्षाच्या करिअरमधील सर्वेश्रष्ठ विजय असल्याचे राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार शेन वॉर्नने म्हटले आहे.
आपल्या संघातील युवा खेळाडू नीरज पटेल (नाबाद 40) आणि रविंद्र जडेजा (नाबाद 23) यांचे त्याने कौतुक केले. सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्याने सांगितले की, कालच्या सामन्यातील विजय हा 'न भूतो न भविष्य' अशा प्रकाराचा होता.
आमचा संघ दबावात चांगले प्रदर्शन करत असून आत्मविश्वास हा विजयाचा शिल्पकार असल्याचे त्याने म्हटले. दबावामध्ये खेळण्याचा प्रत्येक खेळाडूला आत्मविश्वास असला पाहिजे. कारण, कालच्या सामन्यात जडेजा आणि पटेल यांनी केलेला खेळ कौतूकास्पद आहे.