शितपेय निर्माता कंपनी कोकाकोलाचा ट्वेंटी..20 आयपीएल स्पर्धावर डोळा असून मालिकेचे प्रायोजकत्व मिळवण्याचा विचारात आहे.
कोकाकोला इंडियाचे निर्देशक मंसूर सिद्दीकी यांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकामध्ये आयोजित आयपीएलच्या दुसर्या मालिकेत मोठ्याप्रमाणात प्रायोजकत्व स्विकारले जाईल.
कोकाकोला व आयपीएलचा संघ दिल्ली डेयरडेविल्स तसेच कोलकत्ता नाइटराइर्स यांच्यात आधीच करार झाला आहे.
कोकाकोला शितपेय विक्रीसाठी कंपनी आंतरराष्ट्रीय तसेच सामाजिक नेटवर्किंगचा वापर करणार आहे. कंपनीच्या ग्राहकासाठी बक्षीस योजना जाहीर केल्या असून बक्षीसामध्ये सामन्याच्या तिकिटाचा समावेश केला जाणार आहे.