सहाव्या आयपीएल ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामने रंगात आले आहेत. ही स्पर्धा अंतिम टप्प्यात असलल्यामुळे सर्वाधिक धावा म्हणजे ऑरेंज कॅप मिळविण्यासाठी चुरस सुरू झाली आहे व ती रोमांचक स्थितीमध्ये आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीचा डावखुरा ख्रिस गेल आणि चेन्नई सुपर किंग्जचा माईक हसी या दोघांमध्ये ही चुरस आहे आणि त्याला टॉम अँन्ड जेरीच्या लढाईचे स्वरुप आले आहे. रविवारी झालेल्या कोलकाताविरुद्धच आयपीएल साखळी सामन्यात गेलने 33 धावा काढून सहाव्या सत्रात 600 धावांचा टप्पा पार केला व तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला.
काहीवेळानंतर दुसर्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध हसीने 40 चेंडूंत 40 धावा करून गेलला मागे टाकले व तो 614 धावांसह ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. गेलने 14 सामन्यात 60.30च्या सरासरीने 603 तर हसीने 13 सामन्यात 55.81 च्या सरासरीने 614 धावा काढल्या आहेत. काल मंगळवारी खेळल्या गेलेल्या बंगळुरू आणि पंजाब संघातील साखळी सामन्यात गेलने पुन्हा एकदा हसीला मागे टाकले व ऑरेंज कॅप त्याने मिळविली.