पंजाब किंग्जला स्पर्धेत दोनदा नमवल्याने उपांत्य फेरीतील लढतीत चेन्नई सुपर किंग्ज संघ भक्कम मानसिकतेने मैदानात उतरणार असल्याचे प्रशिक्षक केप्लर वेसल्स यांनी स्पष्ट केले. याअगोदर संघाची बांधणी बळकट असताना त्यांना दोनदा पराभूत केले आहे.
परदेशातील खेळाडू नसतानाही संघाने विजय मिळवले आहे. या विक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरूद्ध मैदानात उतरणे चेन्नईसाठी लाभदायकच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. संघास शनिवारी विजय संपादनासाठी खेळाच्या मूळ तंत्राचा अवलंबच फायदेशीर ठरणार आहे.
वानखेडे मैदानावरील खेळपट्टीचा फायदा उठवण्यास दोन्ही संघास समान संधी आहे. शुक्रवारच्या दिल्ली व राजस्थानदरम्यानच्या उपांत्य सामन्यातून खेळपट्टीचा अंदाज येईलच, असेही त्यांनी स्पष्ट केले.