Publish Date: Mon, 19 May 2008 (23:39 IST)
Updated Date: Mon, 19 May 2008 (23:31 IST)
इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे तीन धावांनी विजय मिळाला.
सलग दोन दिवस हवामान खराब असल्याचा फटका नाइट रायडर्सला बसला आहे. सुसाट वारा सुटल्यानंतर स्टेडियममधील विजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमाचा आधार घेत चेन्नई संघाला विजयी घोषीत करण्यात आले. सलामीवीर स्टीफन फ्लेमिंग व पाथिर्व पटेल यांनी चेन्नईला 55 धावांची सलामी दिली होती.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या कोलकाता संघाची मखाया एनटिनीच्या भेदक गोलंदाजीपुढे टीकाव लागू शकला नाही. त्याने संपूर्ण सामन्यात चार बळी मिळवून हॅटट्रीकचा विक्रमही केला. सलमान बटने
कोलकाता संघतील सलमान बटने 53 धावांचा अर्धशतकी खेळ करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच्या या प्रयत्नावर पावसाने पाणी फेरले. तिसर्या विकेटसाठी त्याने देबब्रत दाससह 86 धावांची भागिदारी केली. परंतु, एकामागे एक बाद होणार्या खेळाडूंमुळे तो हतबाल झाला.
त्याने 54 चेंडूत दहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 73 धावा केल्या. शेवटी बालाजीच्या चेंडूवर तो पायचित झाला. सलामीवीर मखाया एनटिनीला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला.